Share

शाहरुख ‘देशद्रोही’ तर बांगलादेशच्या शेख हसीना यांना आश्रय देणारे मोदी कोण? संजय सिंहांचा भाजपला सणसणीत सवाल!

AAP leader Sanjay Singh questions BJP’s double standards, comparing attacks on SRK with PM Modi sheltering Sheikh Hasina and Adani supplying power to Bangladesh.

Published On: 

AAP leader Sanjay Singh questions BJP's double standards, comparing attacks on SRK with PM Modi sheltering Sheikh Hasina and Adani supplying power to Bangladesh.

नवी दिल्ली: राजकारणात सोयीनुसार राष्ट्रवादाच्या व्याख्या कशा बदलल्या जातात, याचा उत्तम नमुना सध्या पाहायला मिळतोय. बांगलादेशमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि त्यांच्या समर्थकांकडून शाहरुख खानला लक्ष्य केलं जात असतानाच, आता आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी भाजपला असा काही प्रश्न विचारलाय की, त्यांची बोलतीच बंद झाली आहे.

संजय सिंह यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांना लक्ष्य करत भाजपच्या ‘दुतोंडी’ भूमिकेचे वाभाडे काढले आहेत. शाहरुख खानने आपल्या आयपीएल टीममध्ये बांगलादेशी खेळाडूला संधी दिली म्हणून जर तो ट्रोल होतोय, तर मग भारत सरकार काय करतंय? हाच धागा पकडत संजय सिंह कडाडले आहेत.

Sanjay Singh Attack on Narendra Modi

त्यांनी ( Sanjay Singh ) अत्यंत आक्रमक शब्दांत विचारलंय, “जर बांगलादेशचा खेळाडू संघात ठेवला म्हणून शाहरुख खान ‘देशद्रोही’ ठरत असेल, तर मग त्याच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात आश्रय देणाऱ्या मोदींना काय म्हणायचं?”

संजय सिंह इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी अदानींचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. ते म्हणाले, “भारताची वीज बांगलादेशला देणाऱ्या अदानींना कोणतं विशेषण लावणार? ते देशभक्त की देशद्रोही?” बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत असताना, दुसरीकडे मोदी सरकार शेख हसीना यांना सुरक्षित ठेवते आणि अदानी वीज पुरवतात, मग फक्त शाहरुखलाच का टार्गेट केलं जातंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

भाजपच्या या सोयीस्कर राजकारणावर सोशल मीडियावरही सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आता संजय सिंहांच्या ( Sanjay Singh ) या ‘गुगली’वर भाजपचे प्रवक्ते काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही