Share

“अक्षय खन्नाचा ‘इगो’ दुखावला अन्…”; दिग्दर्शकाला थेट सिनेमातूनच हाकललं, धक्कादायक खुलासा!

Director Manish Gupta accuses Akshaye Khanna of unprofessionalism, claiming the actor got him fired from ‘Section 375’ due to ego issues.

Published On: 

Director Manish Gupta accuses Akshaye Khanna of unprofessionalism, claiming the actor got him fired from 'Section 375' due to ego issues.

🕒 1 min read

मुंबई – एकीकडे ‘धुरंधर’ सिनेमातल्या डान्स स्टेप्समुळे अक्षय खन्नाचं (Akshaye Khanna) सध्या सोशल मीडियावर तुफान कौतुक होतंय, तर दुसरीकडे त्याच्या स्वभावाचे वाभाडे निघत आहेत. पडद्यावर अत्यंत शांत आणि संयमी वाटणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यात किती ‘मुजोर’ असू शकतो, याचा एक धक्कादायक किस्सा आता समोर आला आहे. ‘दृश्यम 3’ च्या वादात अडकलेल्या अक्षयबद्दल आता एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सध्या निर्माते कुमार मंगत आणि अक्षय खन्ना यांच्यात ‘दृश्यम 3’ वरून वाद सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर लेखक-दिग्दर्शक मनीष गुप्ता यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. २०१७ मध्ये ‘सेक्शन 375’ सिनेमासाठी मनीष यांनी अक्षयला साईन केले होते. तेव्हा अक्षयची फी २ कोटी ठरली होती आणि त्याने २१ लाख ॲडव्हान्सही घेतला होता.

Manish Gupta accuses Akshaye Khanna

मनीष गुप्ता म्हणतात, “अक्षयने आमच्या ठरलेल्या तारखा ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ला दिल्या आणि लंडनला पळाला. आमचं शूटिंग ६ महिने रखडलं.” पण थांबा, खरा ड्रामा तर तो परतल्यावर सुरू झाला. परत आल्यावर अक्षयने फी वाढवून ३.५ कोटींची मागणी केली. इतकेच नाही तर, त्याला सिनेमावर पूर्ण क्रिएटिव्ह कंट्रोल हवा होता.

मनीष गुप्ता यांनी अक्षयच्या तालावर नाचण्यास नकार दिला, तेव्हा अक्षयचा इगो दुखावला. गुप्ता यांच्या आरोपांनुसार, “अक्षयने निर्माते कुमार मंगत यांच्यावर दबाव टाकला आणि मला दिग्दर्शक पदावरून हटवायला लावलं. इतकेच नाही तर, ज्या स्क्रिप्टवर आणि प्री-प्रॉडक्शनवर मी तीन वर्षे काम केलं होतं, ते सर्व साहित्य आणि हार्ड डिस्क त्यांनी जप्त केली.”

विशेष म्हणजे, तेव्हा मनीष गुप्तांनी कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर प्रकरण कोर्टाबाहेर मिटवलं गेलं. पण, “आज कुमार मंगत यांना त्याच अक्षयच्या वागणुकीचा त्रास होतोय, हे एकप्रकारे कर्मच आहे,” असा टोलाही मनीष यांनी लगावला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या