🕒 1 min read
विशेष प्रतिनिधी | बीड
राजकारणात एका रात्रीत कसा गेम पालटतो, याचा प्रत्यय बीडकरांना पुन्हा एकदा आलाय. पूजा मोरेंनी ( Pooja More ) माघार घेतली आणि विषय संपला असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकताय. कारण खरी ‘दंगल’ तर आता सुरू झाली आहे! या एका माघारीने बीडचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले असून, लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
Laxman Hake warns Maratha Leader
झालं असं की, पूजा मोरेंच्या माघारीनंतर लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये थेट बड्या नेत्यांची नावं घेतली आहेत. हाके यांनी इशारा देताना स्पष्टच म्हटलंय, “पूजा मोरे हा तर फक्त ट्रेलर आहे. खासदार बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि राजेश टोपे यांचा पिक्चर अजून बाकी आहे.” ओबीसी नेत्यांना टार्गेट करणाऱ्यांना आता परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दमच त्यांनी भरलाय.
पण थांबा… या वादात आता दुसरी बाजूही तितक्याच ताकदीने समोर आली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटलांनी ( Manoj Jarange Patil ) या प्रकरणावर रोखठोक भाष्य केलंय. निवडणुकीच्या तोंडावर जुने व्हिडिओ व्हायरल करण्याच्या प्रकारावर त्यांनी संताप व्यक्त केला. “जुने व्हिडिओ उकरून काढून कोणाला टार्गेट करणं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” अशा शब्दांत त्यांनी ट्रोलर्सचा समाचार घेतला.
आता खरी गंमत बघा… एकीकडे हाके याला ‘पाप’ म्हणत आहेत, तर दुसरीकडे जरांगे याला ‘संस्कृतीचा ऱ्हास’ म्हणत आहेत. त्यामुळे पूजा मोरे प्रकरण आता केवळ एका मतदारसंघापुरते मर्यादित न राहता, त्याला ‘ओबीसी विरुद्ध मराठा’ असा नवा रंग चढताना दिसतोय. या ‘ट्रेलर’चा क्लायमॅक्स काय असेल, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “ज्यांनी ७० हजार कोटींचे आरोप केले, त्यांच्याच मांडीला मांडी…”; अजितदादांचा भरसभेत ‘सेल्फ गोल’ की टोला?
- “भाजपला ‘लुटारूंची टोळी’ म्हणत झोडपलं, अन् त्याचवेळी शरद पवारांचे कौतुक; अजितदादांच्या भाषणानं राजकीय वर्तुळात खळबळ!”
- “भाजपची ती ‘राक्षसी भूक’ मला पाहवत नाही”; अजितदादांनी पिंपरीत एकाच वेळी फोडले भ्रष्टाचाराचे १० बॉम्ब!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












