Tea । चहा हा अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. अनेकजण त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. तर काहीजण त्यांच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करतात. परंतु अनेकांना चहा पिण्याची योग्य वेळ माहिती नसते. (Health Tips)
जर चुकीच्या वेळी चहा घेतला (Drinking Tea) तर याचा परिणाम पचनशक्तीवर होतो. चहाची योग्य वेळ जाणून घेतली तर चहा प्यायला तरी त्याचा शरीरावर वाईट परिणाम होणार नाही (Drinking tea side effect). चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? जाणून घेऊयात.
सकाळी उठताच चहा पिणे योग्य की अयोग्य? (Drinking Tea Or Coffee In The Morning Is Health Or Not)
ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी शरीर अनेक तास पाणी किंवा अन्नाशिवाय राहते. यावेळी पोटातील डायजेशन प्रक्रिया कमी होऊन पित्ताची पातळी वाढू शकते. रिकाम्या पोटी चहा घेतला तर गॅस, चिडचिड आणि अपचन यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. याचा परिणाम प्रतिकारशक्तीवर देखील होऊ शकतो.
चहा पिण्यापूर्वी काय खावे?
जर आपल्याला सकाळचा चहा पिण्याची सवय असेल तर तुम्ही चहा घेण्यापूर्वी प्रथम हलका नाश्ता करा. त्यानंतर साधारण 1 ते 2 तासाने चहा किंवा कॉफीचे सेवन केले तर तुमच्या शरीराला याचा इतका त्रास होत नाही.
जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठले की चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल आणि तुमचे पोट रिकामे असेल तर तुमच्याकडे अजून एक पर्याय आहे. तो म्हणजे तुम्ही चहा किंवा कॉफीसोबत बिस्किट्स खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरावर चहा किंवा कॉफीचा प्रभाव कमी पडतो.
Tea Time In Morning
अनेकांना दिवसातून खूप वेळा चहा पिण्याची सवय असते. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी दिवसातून 1 किंवा 2 वेळाच चहा किंवा कॉफी प्यावी. हिवाळ्यात याचे प्रमाणे 3 ते 4 कप असू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :