IPL 2025 । लवकरच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यासाठी क्रिकेटच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच आयपीएलचे वेळापत्रक (IPL Schedule 2025) जाहीर केले जाणार आहे. परंतु, चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
दरवर्षी अनेक चाहते स्टेडियमवर आयपीएलचे सामने पाहतात तर अनेक चाहते मोबाईल किंवा डिजीटल गॅजेट्सवर हे सामने मोफत पाहण्याचा आनंद लुटतात. परंतु चाहत्यांना आता आयपीएल 2025 चे सामने मोफत पाहता येणार नाही.
आता Viacom18 आणि Star India यांचे विलीनीकरण झाले आहे. आता जिओचा जियो हॉटस्टार (Jio Hotstar) हे नवीन अॅप आले आहे. पण येथे चाहत्यांना IPL सामन्यांचा मोफत आनंद घेता येणार नाही. जर चाहत्यांना सामने पाहायचे असतील तर पैसे खर्च करावे लागतील.
जर चाहत्यांकडे सदस्यत्व नसेल तर आयपीएलचे लाईव्ह स्ट्रीमिंग (Live streaming of IPL 2025) काही मिनिटेच सामने पाहता येतील. परंतु, मोफत सामन्याची वेळ संपल्यानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा सबस्क्रिप्शनचा मेसेज स्क्रिनवर दिसेल. सबस्क्रिप्शन असेल तरच त्यांना सामने पाहता येतील.
IPL 2025 Jiohotstar Subscription Charges
जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेऊन आयपीएल 2025 च्या सामन्यांचा आनंद घ्यायचा असेल तर सबस्क्रिप्शन पॅकची सुरूवात 149 रूपयांपासून सुरू होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ऍड फ्री व्हर्जनसाठी तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करण्यासाठी 499 रुपये प्रेक्षकांना मोजावे लागू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :