Dhananjay Munde । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच ते मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही सतत आरोप करत असतात.
अशातच आता सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे अनेकांच्या आश्चर्याने भुवया उंचावल्या आहेत. या भेटीबाबत सुरेश धस यांनी माहिती दिली आहे.
“धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची भेट घेणे यात काहीच चुकीचे नाही,” असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले. परंतु, धनंजय मुंडे यांनी आपण कोणाला भेटलो नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Dhananjay Munde on Suresh Dhas
“माझी कोणासोबतही भेट झाली नाही. सध्या मी डोळ्याच्या सर्जरीमुळे विश्रांती घेत होतो. काल मी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो आहे. त्यांच्याशिवाय माझी कोणासोबतही गुप्त भेट झाली नाही,” असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एकीकडे सुरेश धस हे आपण धनंजय मुंडे यांची प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे धनंजय मुंडे आपण कोणालाही भेटलो नसल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट झाली का? असा सवाल अनेकांना पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :