Suresh Dhas । संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी वाल्मिक कराडची (Walmik Karad) बी टीम आम्हाला धमकावत असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी या टीममध्ये कोणाचा सहभाग आहे? याचाही खुलासा केला. यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“धनंजय देशमुखांच्या बोलण्यात तथ्य आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी काही लोक आरोपींशी फोनवर बोलत होते. आरोपी जेव्हा फरार होते, त्यावेळी बी टीममधले लोक या आरोपींना सहकार्य करीत होते. हे लोक सहआरोपी करावेत,” अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
“काही लोक थेट आकाला मदत करताना दिसत आहेत, अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी. जोपर्यंत आकाचे सहकारी, आका आणि ज्यांनी ज्यांनी संतोष देशमुख यांना मारले आहे ते सगळे फाशीवर जाईपर्यंत लढा सुरू राहील,” असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले आहे.
Suresh Dhas on Walmik Karad
पुढे ते म्हणाले की, “एखादा आरोपी हा आरोपी आहे हे सिद्ध होऊन देखील त्याला मदत करणे आणि जो माणूस डॉक्टर आहे, त्याने या आरोपींना मदत करणे योग्य नाही. मी याबाबत एक लेखी पत्र तयार केले असून ते बसवराज तेली यांना देणार आहे,” असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबतच्या भेटीबाबतही भाष्य केले. “अजित पवार यांनी मला वेळ नाकारलेली नाही. त्यांच्याकडे मी वेळच मागितलेली नव्हती. त्यांनी मला अगोदरच्या दिवशी वेळ दिली होती. पण मला वेळेवर जायला जमले नसल्याने आमची भेट झाली नाही,” असे धस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :