Jitendra Awhad । “हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) दिला,” असे वक्तव्य राज्यकृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत.
माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. याच मुद्द्यावरून विरोधक त्यांना घेरत आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत अकाउंट एक्सवरून एक व्हिडिओ शेअर करत माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Jitendra Awhad Post on X
“राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना,सत्तेचा माज चढलाय, हे त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. ते म्हणाले,”आजकाल भिकारी देखील 1 रुपया घेत नाही,परंतु आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतोय..!” देशाच्या पोशिंद्याला भिकाऱ्याची उपमा देणाऱ्या माणिकराव कोकाटे यांनी तमाम शेतकरी बांधवांची तत्काळ माफी मागावी,” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
Ambadas Danve on Manikrao Kokate
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही कोकाटे यांच्यावर टीका केली आहे. “ज्या शेतकऱ्यांना आपण अन्नदाता म्हणतो, त्याला या सरकारमधील कृषीमंत्रीच भिकाऱ्यांची उपमा देत आहेत. 1 रुपयात विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करत नाही. याच शेतकऱ्यांच्या बळावर राज्य चालते,” अशी टीका दानवे यांनी केली आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधक देखील त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. यावरून कोकाटे शेतकऱ्यांची माफी मागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :