High blood pressure । धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अनेकदा हे आजार जीवघेणे देखील ठरतात. अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते. (Health Tips)
ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास (High blood pressure problem) असतो त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः व्यायाम करताना काळजी घेणे गरजेचे आहे. (High BP) जड व्यायाम करणे टाळावे, वजन उचलणे, वेगाने धावणे यामुळे हृदयावर दबाव येतो.
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी व्यायाम करत असताना श्वासाकडे लक्ष द्यावे. कारण वेगाने श्वास घेतला तर रक्तदाब असंतुलित होऊ शकतो. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नाहीतर तुम्हाला त्याचे नुकसान सहन करावे लागू शकते.
High blood pressure problem
उच्च रक्तदाबामुळे ह्रदय आणि रक्तवाहिन्यांवर दबाव येतो. त्यामुळे कोणताही व्यायाम करताना सुरुवातीला चालणे, सायकलिंग किंवा हलकी योगासने करा. जर तुम्ही व्यायाम करताना अशी काळजी घेतली नाही तर तुम्हाला याचे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या
महत्त्वाच्या बातम्या :