Share

Sonu Sood च्या अडचणी वाढल्या! न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी, जाणून घ्या नेमकं प्रकरण

by MHD
Arrest Warrant Against Actor Sonu Sood

Sonu Sood । कोणत्याही संकटात अनेकांच्या मदतीला धावून येणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद होय. हा अभिनेता सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. सोशल मीडिया (Social media) वरही तो सतत सक्रिय असून त्याच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे.

परंतु, हा अभिनेता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. लुधियानाचे वकील राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांनी मोहित शुक्ला या व्यक्तीच्या विरोधात तब्बल 10 लाख रुपयांची फसवणुकीची केस दाखल केली होती. याचप्रकरणात सोनू सूदलाही (Actor Sonu Sood) साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आले होते.

परंतु, अनेक वेळा समन्स बजावूनही सोनू सूद न्यायालयात हजर राहिला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. (Arrest Warrant ) त्याच्या अटकेचे वॉरंट आता मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये पाठवण्यात आलं आहे.

याप्रकरणी सोनू सूदला अटक करून त्याला कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावर सोनू सूदने प्रतिक्रिया देखील दिली आहे. “मी कोणत्याही गोष्टीचा ब्रँड अम्बेसेडर नसून मी यापूर्वीच वकिलांना उत्तर दिले आहे. 10 फेब्रुवारी रोजीच पुन्हा याचे उत्तर देईन. पब्लिसिटी करायची आहे, म्हणून या गोष्टी होत आहेत,” असा आरोप सोनू सूदने केला आहे.

Arrest Warrant Against Sonu Sood By Ludhiana Court

दरम्यान, सोनू सूदचा नुकताच फतेह सिनेमा रिलीज झाला. यामध्ये सोनू सूद मुख्य कलाकाराच्या भूमिकेत होता. त्याच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सोनू सूदने स्वत:च या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केले होते.

महत्त्वाच्या बातम्या :

Sonu Sood । कोणत्याही संकटात अनेकांच्या मदतीला धावून येणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद होय. हा अभिनेता सतत कोणत्या ना कोणत्या …

पुढे वाचा

Entertainment Marathi News

Join WhatsApp

Join Now