Suresh Dhas । अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना आज वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कोर्टाने करुणा मुंडे (Karuna Munde) यांना धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नी म्हणून मान्य करत त्यांना प्रत्येक महिन्याला 1 लाख 25 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे आधीच अडचणीत असलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. विरोधक देखील त्यांच्यावर हाच मुद्दा समोर ठेवून टीका करत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आता याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
“करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, असे मी अगोदरच सांगितले होते. त्यामुळे मला आता त्या पलिकडे काहीही बोलायचे नाही. त्यांची पहिली पत्नी असो, दुसरी असो, यावर आता आम्हाला कोणतीही चर्चा करायची नाही,” अशी मोजक्याच शब्दात सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Suresh Dhas on Dhananjay Munde and Karuna Munde
पुढे ते म्हणाले की, “आमचे लक्ष आता फक्त संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यावर आहे. तसेच महादेव मुंडे (Mahadev Munde) यांचे देखील लवकरात लवकर मारेकरी सापडले पाहिजेत. त्यांची लेकरबाळ रडत आहेत. या दोघांच्याही हत्येचे मारेकरी सापडावेत ही आमची प्रायोरेटी आहे,” अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :