Karuna Munde । महाराष्ट्र राज्य महिला आयोग (Maharashtra State Commission for Woman) हा महिलांच्या हक्कांसाठी काम करतो आणि त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे काम करतो. परंतु, करुणा मुंडे यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पुढाकार घेतला नसल्याचे पाहायला मिळत आहे.
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात करुणा मुंडे या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे गेल्या होत्या. परंतु, महिला आयोगाकडून कोणतीही ठोस निर्णय घेतला नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला. यामागचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर.
रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि धनंजय मुंडे हे एकाच पक्षाचे आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी करुणा मुंडे यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. आपल्याच पक्षाच्या बड्या नेत्याच्या विरोधात न जाता चाकणकर या करुणा मुंडे यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत.
परंतु, करुणा मुंडे यांनी खचून न जाता याप्रकरणी लढा दिला आणि आज त्यांच्या लढ्याला यश आले आहे. परंतु, रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेनंतर अनेक सवाल उपस्थित राहिले आहेत. जर कोणाचाही आधार नसलेली एखादी महिला अडचणीत येत असेल आणि महिला आयोग त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर अशावेळी त्या महिलांनी काय करावे?
महिला आयोग केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांना न्याय देते आणि नेताच जर राष्ट्रवादीचा असला तर काही करत नाही. पक्षाची बाजू घेणाऱ्या रुपाली चाकणकर यांना अशावेळी तातडीने पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणी जनसामान्यांतून समोर येत आहे.
Sushma Andhare on Rupali Chakankar
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर महिला आयोगाबाबत एक पोस्ट केली आहे. “अत्यंत निष्क्रिय तथा निरुपयोगी महिला आयोगाकडून कुठलीही ठोस कृती न झाल्याने निराश झालेल्या करुणा मुंडे यांना अखेर न्यायालयामध्ये न्याय मिळाला. हा लढा एका स्त्रीने निव्वळ आर्थिक नुकसान भरपाईसाठी नाही तर आत्मसन्मानासाठी लढलेला लढा आहे. करुणा मुंडे यांचे अभिनंदन,” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :