Dhananjay Munde । करुणा मुंडे यांना घरगुती हिंसाचारप्रकरणी वांद्रे कोर्टाकडून (Bandra Court) दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. धनंजय मुंडेंना कोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याला 1 लाख 25 हजार आणि मुलगी शिवानी मुंडेच्या लग्नापर्यंत मासिक 75 हजार रुपये पोटगी पोटगी द्यावी लागणार आहे.
कोर्टाच्या या निकालानंतर करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. “महिलांना खूप त्रास दिला जातो. मी मागील तीन वर्ष यासाठी लढा देत असून हा लढा माझ्यासाठी सोपा नव्हता. आज सत्याचा विजय झाला आहे. एक महिला असताना इतक्या मोठ्या शक्तीसमोर लढणं खूप अवघड झालं. माझ्या पतीसोबत संपूर्ण व्यवस्था आहे. त्यांच्यासोबत खूप मोठमोठे राजकारणी लोक होते. माझ्यासोबत माझे एक सर्वसाधारण वकील होते,” अशी प्रतिक्रिया करुणा मुंडे यांनी दिली आहे. (Dhananjay Munde vs Karuna Munde)
यावर आता धनंजय मुंडे यांनीही आपल्या वकिलामार्फत प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर अजून काहीही निर्णय दिला नाही. अर्जदारांच्या आर्थिक गरजांच्या आधारावर हा आदेश दिला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपची कबुली दिली होती. याच्याच आधारे कोर्टाने हा आदेश दिला आहे, असा दावा धनंजय मुंडे यांनी वकील सायली सावंत यांच्यामार्फत केला आहे.
Dhananjay Munde on Bandra Court Result
करुणा मुंडे म्हणतात “मला तुरुंगात टाकल्यापासून माझी बहीण आणि माझ्या भावाने माझा नंबर ब्लॉक केला असल्याने मागील तीन वर्षांपासून मी एकटीच लढत आहे. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात. पण हे विचार मनात आले की मला माझ्या आईचा चेहरा डोळ्यासमोर येतो. जर मी रखेल असते तर 50 कोटी रुपयांचे कन्स्ट्रम हायकोर्टात फाईल केले आहे. मी त्याची कॉपी देऊ शकते पण मी रखेल नसून मी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे,” असे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- “धनंजय मुंडेंसोबत मोठमोठे राजकारणी अन् माझ्यासोबत..”; कोर्टाच्या निकालानंतर Karuna Munde यांना अश्रू अनावर
- Dhananjay Munde घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, करुणा मुडेंना दरमहा द्यावी लागणार लाखो रुपयांची पोटगी
- “धनंजय मुंडे भ्रष्टाचारी, त्यांचा राजीनामा घेतला तरच सरकारची…”; Vijay Vadettiwar यांची जहरी टीका