Share

“धनंजय मुंडेंसोबत मोठमोठे राजकारणी अन् माझ्यासोबत..”; कोर्टाच्या निकालानंतर Karuna Munde यांना अश्रू अनावर

by MHD
Dhananjay Munde vs Karuna Munde on Bandra Court Verdict

Karuna Munde । अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना आज वांद्रे कोर्टाकडून (Bandra Court) मोठा धक्का बसला आहे. त्यांना कोर्टाने घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवत करुणा मुंडेंना प्रत्येक महिन्याला 1 लाख 25 हजार आणि मुलगी शिवानी मुंडेच्या लग्नापर्यंत मासिक 75 हजार रुपये पोटगी पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्टाच्या या निकालानंतर करुणा मुंडे यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. “महिलांना खूप त्रास दिला जातो. मी मागील तीन वर्ष यासाठी लढा देत असून हा लढा माझ्यासाठी सोपा नव्हता. आज सत्याचा विजय झाला आहे. एक महिला असताना इतक्या मोठ्या शक्तीसमोर लढणं खूप अवघड झालं. माझ्या पतीसोबत संपूर्ण व्यवस्था आहे. त्यांच्यासोबत खूप मोठमोठे राजकारणी लोक होते. माझ्यासोबत माझे एक सर्वसाधारण वकील होते,” अशी प्रतिक्रिया करुणा मुंडे यांनी दिली आहे. (Karuna Munde vs Dhananjay Munde)

“असे असूनही न्यायाधीशांनी माझी बाजू घेतली. परंतु, माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. मी दरमहा 15 लाख रुपये मिळावेत अशी मागणी केली होती. कोर्टाने दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले. त्यासाठी आता मी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे,” असा इशारा करूणा शर्मा यांनी दिला आहे.

Karuna Munde on Bandra Court Result

दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना खूप मोठा धक्का बसला आहे. आधीच गोत्यात आलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा गोत्यात आले आहेत. त्यामुळे यावर आता धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात? आणि करुणा मुंडे यांना हायकोर्टाकडून प्रत्येक महिन्याला 15 लाख रुपयांची पोटगी मंजूर होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Karuna Munde । अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना आज वांद्रे कोर्टाकडून (Bandra Court) मोठा धक्का बसला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now