Share

Dhananjay Munde घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, करुणा मुडेंना दरमहा द्यावी लागणार लाखो रुपयांची पोटगी

Dhananjay Munde । मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी संपता संपत नाहीत. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील त्यांच्यावर कृषी साहित्य खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. अशातच आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. धनंजय मुंडे हे आता घरगुती हिंसाचार प्रकरणात … Read more

by MHD

Published On: 

Dhananjay Munde pay alimony of 1 lakhs 25 thousand to Karuna Munde

Dhananjay Munde । मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी संपता संपत नाहीत. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील त्यांच्यावर कृषी साहित्य खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

अशातच आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. धनंजय मुंडे हे आता घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी आढळले असून त्यांच्यावर करूणा मुंडेंकडून केले आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंना करूणा मुंडे (Karuna Munde) यांना दर महिन्याला 1 लाख 25 हजार आणि मुलगी शिवानी मुंडेच्या (Shivani Munde) लग्नापर्यंत मासिक 75 हजार रुपये पोटगी द्यावी लागणार आहे. याबाबतचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

कोर्टाच्या निर्णयामुळे धनंजय मुंडेंना मोठा झटका बसला आहे. करूणा मुंडे यांनी वांद्रे फॅमिली कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती. इतकेच नाही तर करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंविरोधात बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती. मागील काही वर्षांपासून हा खटला कोर्टात सुरु होता. कोर्टाच्या निर्णयावर धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dhananjay Munde vs Karuna Munde

दरम्यान, यावर धनंजय मुंडेंवर सतत आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत एक्सवर एक पोस्ट केली आहे. “करुणा मुंडे या फैमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,000 रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत,” अशा आशयाची पोस्ट दमानियांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही