Share

Santosh Deshmukh हत्येप्रकरणी फरार कृष्णा आंधळे सापडत नसल्याने Supriya Sule यांचा सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

by MHD
Supriya Sule targets Govt due to Krishna Andhale in Santosh Deshmukh murder case

Supriya Sule । संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) आतापर्यंत पोलिसांना 8 जणांना ताब्यात घेतले आहे. तर कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अजूनही फरारच आहे. राज्याच्या विविध भागात पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. तरीही तो पोलिसांना गुंगारा देण्यास यशस्वी होत आहे.

त्याला लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी संतोष देशमुख कुटुंबियांसह सर्वपक्षीय राजकीय नेते करत आहेत. यावरून आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्य सरकारला माध्यमांशी संवाद साधताना सवाल विचारला आहे.

“संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील काही आरोपींवर मकोका लावला, या निर्णयाचे आम्ही स्वागत केले. पण बीड हत्या प्रकरणातील एक आरोपी ज्याच्यावर हत्येचा आरोप आहे, तो अजूनही फरार आहे. तो पोलिसांना का सापडत नाही? असा कुठे तो फरार झाला आहे, जो महाराष्ट्रातल्या यंत्रणांना सापडत नाही, ही बाब धक्कादायक आहे,” असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

Supriya Sule on Krishna Andhale

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहिल्याने फरार असणाऱ्या कृष्णा आंधळेच्या मित्रांनी धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. वैजनाथ बांगर (Vaijnath Bangar) आणि अभिषेक सानप (Abhishek Sanap) असे मारहाण केलेल्यांचे नाव आहे. त्यांच्याविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी एक पथक रवाना देखील झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Supriya Sule । संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) आतापर्यंत पोलिसांना 8 जणांना ताब्यात घेतले आहे. तर कृष्णा आंधळे …

पुढे वाचा

Crime Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now