Santosh Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणाने (Santosh Deshmukh murder case) बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांना 8 जणांना ताब्यात घेतले आहे. तर कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अजूनही फरारच आहे. राज्याच्या विविध भागात पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत.
अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहिल्याने फरार असणाऱ्या कृष्णा आंधळेच्या मित्रांनी धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वैजनाथ बांगर (Vaijnath Bangar) आणि अभिषेक सानप (Abhishek Sanap) असे मारहाण केलेल्यांचे नाव आहे. या दोघांनी आमच्या बातम्या का पाहतोस? जर तू येथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मीक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी तरुणाला दिली आहे.
या हल्लयानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलीस अधीक्षकांनी धारूर पोलिसांना सूचना केल्या असून मारहाण करणाऱ्यांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींच्या शोधासाठी एक पथक रवाना देखील झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :