Pankaja Munde । आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आष्टी तालुक्यातील साठवण तलाव प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याने पाठ फिरवली. पण आता राजकीय वर्तुळात मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
पंकजा मुंडे यांनी बोलताना 2014 ते 2019 दरम्यानच्या त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळाबद्दल सांगितलं. “सुरेश धस (Suresh Dhas) यांनी उल्लेख केला, पाच वर्षे मी मंत्री राहिले, पालकमंत्री राहिले. पण त्यावेळी जिल्ह्यात मी सुईच्या टोकाएवढीही घटना घडू दिली नाही. बीडमध्ये कानाकोपऱ्यात विकास करत असताना कधी कुणाची जात-धर्म विचारला नाही,” असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले.
“मला देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की, बीडमध्ये जेव्हा सहापैकी पाच आमदार निवडून येतात त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होता. बीड जिल्हा तुमच्यासाठी लकी आहे. याहीवेळी पाच आमदार आहेत. कामातून ओळख निर्माण करण्याचे संघाचे संस्कार असून यातून वाढलेला एक माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे,” असा दावा मुंडे यांनी केला.
Pankaja Munde on Dhananjay Munde
पुढे त्या म्हणाल्या, “देवेंद्रजी तुम्ही ज्यावेळी सीएम म्हणून बाहुबली म्हणतात. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. तुम्ही कॅबिनेटचे प्रमुख आहात. तुमच्या विषयी आदरभाव नेहमी येतो. पण आज ममत्व भाव येत आहे. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षापूर्वी मला शिवगामी म्हणत होते,” असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :