Share

शिरसाट यांची Sanjay Raut यांच्यावर खालच्या पातळीची टीका, म्हणाले “शहीद झाले असते…”

by MHD
Sanjay Shirsat Shocking statement about Sanjay Raut

Sanjay Raut । सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वर्तुळात कायम जुंपल्याचे पाहायला मिळते. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष निर्माण झाल्याने अनेकदा राजकीय वर्तुळाचे वातावरण देखील तापत असते. यामुळे राजकारणाची पातळी खालावत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

खासदार संजय राऊत आणि शिंदे गटामध्ये कामाख्या मंदिराच्या भेटीवरून वाद सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे वर्षावर का जात नाहीत? असा सवाल राऊत यांनी विचारला होता. त्यावर आता मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Shirsat vs Sanjay Raut)

“संजय राऊत कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या वेळी जायला हवे होते. तिथे त्यांच्या अंगावर सर्वजण पडले असते आणि संजय राऊत हे चेंगरले असते तर कमीत कमी शहीद झाले असते. रोज तोंडातील घाण पसरवण्यापेक्षा गंगेत गेला असं तरी सांगितलं गेलं असतं. पण दुर्देव आहे,” अशी जहरी शिरसाट यांनी केली आहे.

Sanjay Shirsat on Sanjay Raut

पुढे ते म्हणाले, “वर्षा बंगल्यावर रेडे आणि शिंग तिथे आहे म्हणतात. पण मलाही बंगला नाही. मग माझ्या येथे देखील रेड्याचे शिंग आहेत का? जरी तुम्हाला वाटतं असलं तुम्ही विद्वान आहात तरी पण लोकं तुम्हाला मूर्खात काढतात एकदिवस लोकांमध्ये अंधश्रद्धा पसवरणं तुमच्या अंगलट येईल,” असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. दरम्यान, शिरसाट यांच्या टीकेनंतर राज्यात आता राऊत विरुद्ध शिरसाट असा नवा संघर्ष पाहायला मिळेल. यावर आता संजय राऊत यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Sanjay Raut । सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वर्तुळात कायम जुंपल्याचे पाहायला मिळते. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष निर्माण झाल्याने …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics