पुणे । राहुल सोलापूरकरने (Rahul solapurkar) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी संताप व्यक्त केला आहे. राहुल सोलापूकर कोण आहे, अशांना गोळ्या घालायला पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटलं. तर, राहुल सोलापूरकर नावाचा नालायक नट काहीतरी बोललेला आहे. तो जिथे दिसेल तिथे लोकांनी त्याला बदडून काढावं. कवट्या महांकाळ जे बोलला ते अतिशय चुकीचं आहे, अशा विकृती महाराष्ट्रात पैदाच कशा होतात, हा माझा प्रश्न आहे, असे सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
उदयनराजे बोलताना म्हणाले, एकता हा महाराजांचा मूळ मंत्र होता, लोकशाहीचा पाया शिवाजी महाराजांनी रचला, त्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही. वेगवेगळ्या जातीच्या लोकांकडे त्यांनी कुटुंब म्हणून पाहिलं. एका विचाराच्या आधारावर आपण वागत आहोत, छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही.
Udayanraje And Suresh Dhas Vs Rahul solapurkar
राहुल सोलापूर कोण आहे? अशा लोकांच्या जिभा हसाडल्या पाहिजेत. या सगळ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचलं पाहिजे. याच्याविरुद्ध देशद्रोहाचा कायदा लावला पाहिजे. छत्रपती शिवरायांचे विचार जपले नाहीत तर देशाचे तुकडे होतील, यांचे चित्रपट हाणून पाडले पाहिजे, या लोकांना गाडलं पाहिजे. याला गोळ्या घालून मारल पाहिजे असं मला वाटतं, अशा शब्दात उदयनराजेंनी संताप व्यक्त केला.
औरंगजेब हरामखोर होता, तू कमी हरामखोर आहेस का? राहुल्या, तू औरंगजेबाची औलाद आहेस असं वाटतं, त्याचा पोलीस बंदोबस्त काढून घ्यावा. पोलिसांना दुसरा उद्योग नाही का? जनतेच्या रेट्यापुढे पोलीस काही करू शकत नाही. लोकांपेक्षा पोलीस किती आहेत, जनता काही गप्प बसणार नाही, असे उदयनराजे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या