Laxman Hake | क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. पुण्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी नव्हे तर थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली असल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हंटल आहे.
Laxman Hake Slams Udayanraje Bhosale
त्यांच्या या वक्तव्यानं नवीन वादाला तोंड फुटलं असून यावर तीव्र प्रतिक्रिया देखील येत आहेत. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake ) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, उदयनराजे यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. “उदयनराजे यांनी खासदारकीच्या पदाला शोभेल अशा जबाबदारीने विधाने करावीत”, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणालेत?
“स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थाने थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. ती देखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण देखील त्याच राजवाड्यात झालं. महात्मा फुले यांनी त्यांचं अनुकरण करून ही चळवळ पुढे नेली”, असं वक्तव्य उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :