Udayanraje Bhosale । क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. पुण्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी नव्हे तर थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली असल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्यानं नवीन वादाला तोंड फुटलं असून यावर तीव्र प्रतिक्रिया देखील येत आहेत.
Udayanraje Bhosale Controversial Statement About Mahatma Jyotiba Phule
“स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थाने थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. ती देखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण देखील त्याच राजवाड्यात झालं. महात्मा फुले यांनी त्यांचं अनुकरण करून ही चळवळ पुढे नेली”, असं वक्तव्य उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलं आहे.
“शिवरायांच्या पश्चात अनेक समाजसुधारकांनी शिक्षणासाठी काम केलं. त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले हे एक होते. महात्मा फुले व्हिजनरी होते. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी संपत्ती गोळा केली ती समाज समाजसुधारणेसाठी वापरली”, असंही उदयनराजे यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :