Share

“परतफेड केल्यावरच ‘तो’ व्हिडीओ डिलीट करेन”; Nitesh Rane यांचा ठाकरेंना इशारा 

Nitesh Rane has warned Uddhav Thackeray over the video of Narayan Rane's arrest.

Nitesh Rane । केंद्रीय मंत्री असताना २३ ऑगस्ट २०२१ रोजी नारायण राणे (Narayan Rane) यांना जेवणाच्या ताटावरून उठवत अटक करण्यात आली होती. नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.

महाडमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना “स्वातंत्र्या दिनाबद्दल ज्यांना माहित नाही त्यांनी फार काही बोलू नये. मी असतो तर त्या दिवशी कानशिलात लगावली असती”, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

Nitesh Rane On Uddhav Thackeray Group

दरम्यान, या घटनेची आठवण त्यांचे पुत्र मंत्री नितेश राणे यांनी आज करून दिली. आज नारायण राणे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त बोलत असताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे गटाला भयभीत इशारा दिला आहे.

“त्या अटकेचा क्षण आजही माझ्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी परतफेड करेल त्याच दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन. कुणालाही सोडणार नाही”, असा इशारा नितेश (Nitesh Rane) यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Nitesh Rane has warned, “The moment of Narayan Rane’s arrest is still saved in my mobile. I will delete that video the day he pays back. I will not spare anyone.”

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now