Udayanraje Bhosale । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. राज्यभरातून आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी मोर्चे काढले जात आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
असे असताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी त्यांना पाठिंबा देत आरोपींना मारहाण झाली म्हणून त्यांची मानसिकता बिघडली असल्याचा दावा केला. यामुळेही नामेदव शास्त्री यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. यावर आता याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“या प्रकरणात कोणाची गय केली जाणार नसून कोणी काहीही म्हणो, पण दोषींवर कारवाई होणारच आहे. आपल्या देशात लोकशाही असून येथे न्यायालयासमोर सर्वच समान आहेत. काहीही झाले तरी यातील दोषींवर कारवाई होणार आहे,” असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
Udayanraje Bhosale on Santosh Deshmukh murder case
दरम्यान, याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. पण मुंडे यांनी आपण राजीनामा देणार नाही असे स्पष्ट केले असताना विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :