🕒 1 min read
Shreyas Talpade । ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा 2’ मध्ये अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) ला आवाज देणारा अभिनेता श्रेयस तळपदे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. सध्याही तो चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, पण एका वेगळ्याच कारणामुळे.
श्रेयस तळपदे आणि ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ (Alok Nath) यांच्यावर तब्बल 45 गुंतवणूकदारांची 9.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोघांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल (FIR registered) करण्यात आला आहे, यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 16 सप्टेंबर 2016 रोजी ‘ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ मध्य प्रदेशातील इंदूर इथं नोंदणीकृत असल्याचं सांगितले होते. गुंतवणूकदारांना यामध्ये मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यांसाख्या योजनांच्या ऑफर देण्यात येत होत्या.
त्यामुळे चांगले व्याजदर मिळत असल्याने अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. परंतु लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून ही कंपनी अचानक गायब झाली आहे. या सोसायटीच्या गुंतवणूक योजनांचा प्रचार आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे या दोघांनीही केला असल्याने ते अडचणीत आले आहेत.
FIR registered against Alok Nath and Shreyas Talpade
दरम्यान, अभिनेता सोनू सूद देखील या संस्थेच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. या प्रकरणावरून बॉलिवूड विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रतिक्रियेकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- आरोपींची गुन्हेगारी कुंडली पाहून Namdev Shastri झाले थक्क, घेतला मोठा निर्णय
- धनंजय मुंडे यांचा राजीनामा निश्चित? Anjali Damania आज करणार मोठा खुलासा
- “भगवानगडाची मदत नाही, तर त्यापेक्षा आम्हाला…”; Dhananjay Deshmukh यांनी केली मोठी मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










