Dhananjay Deshmukh । भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. त्यामुळे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे कुटुंबीय दुखावले आहे. यावरून धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्यावर निशाणा साधला होता.
“नामदेव शास्त्री म्हणाले की या हत्येतील आरोपींची मानसिकता खराब झाली. पण त्यांच्याकडे सगळी माहिती नसल्यामुळे ते असे म्हणाले. आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल? आमची लेकरे पोरकी झाली आहेत. माझा भाऊ गेला आहे. आई-वडील म्हातारे झाले आहेत. आता आम्ही काय करायचे? आमचा भाऊ परत कुठून आणायचा? असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता धनंजय देशमुखांनी मोठी मागणी केली आहे.
“आम्हाला भगवानगडाची मदत नको, न्याय पाहिजे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हीच आमची एकमेव मागणी आहे. आम्हाला यात न्याय मिळायला पाहिजे. गुन्हेगारांना फरार करताना कोणी मदत केली अशा व्यक्तींचीही नावे घोषित करावीत,” अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
Dhananjay Deshmukh on Namdev Shatri help
दरम्यान, धनंजय देशमुख हे लवकरच नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन त्यांना आरोपींविरोधात पुरावे देणार आहेत. त्यावर नामदेव शास्त्री हे आरोपी आणि संतोष देशमुख यांच्यावर काय उत्तर देतात? याकडे देशमुख कुटुंबियांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :