Share

पुण्यात Gulen Barry syndrome (GBS) रुग्णांची संख्या किती? अशी घ्या काळजी

by MHD
Gulen Barry Syndrome patients in Pune

Gulen Barry Syndrome | गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजाराने राज्यात थैमान घालायला सुरुवात केली आहे. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीला कमकुवत करतो. या आजाराचा फटका नवजात बालकांना देखील बसत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला आहे.

पुण्यात या आजारांच्या रुग्णांची संख्या 140 वर (Gulen Barry Syndrome patient) येऊन पोहोचली आहे. तर सध्या 18 जण व्हेंटिलेटरवर आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात हा आजार झालेल्या तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला रक्तदाबाचा त्रास होता. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

याबाबत कन्सल्टंट-न्यूरोलॉजी डॉक्टर निखिल जाधव यांनी माहिती दिली आहे. “पुण्यातील सध्याच्या उद्रेकाचे प्रमुख कारण मोठ्या लोकसंख्येसाठी दूषित पाण्याचे स्त्रोत असण्याची शक्यता आहे. रुग्णांनी जर डॉक्टरांकडून त्वरित उपचार घेतले तर ते बरे होऊ शकतात. लक्षणे दिसायला लागल्यानंतर 5 ते 7 दिवसांत उपचार सुरू झाला तर आजार बरा होतो. याचे आणखी एक कारण म्यूटेंट वेरियंट असू शकतो,” असे निखिल जाधव म्हणाले आहेत.

पुण्यानंतर राज्यातील इतर भागातही रुग्ण वाढत असून सातारा आणि कोल्हापूरमध्येही रुग्णसंख्या आहे. नागपुरातही रुग्णसंख्या आठवर पोहोचली आहे. सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरी सिंड्रोमचे रूग्ण आढळून आले आहेत.

Symptoms of Guillain Barre Syndrome

गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे

हे लक्षात घ्या की गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे अचानक दिसतात. विशेष म्हणजे ही लक्षणे काही दिवसांत किंवा आठवडाभरात झपाट्याने वाढतात. सामान्य लक्षणांमध्ये अंग दुखणे, चालताना तोल जाणे, अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे, चेहरा सुजणे, चालताना व गिळताना त्रास होणे, हात-पाय लुळे पडणे यांसारखी लक्षणे या आजारात दिसतात.

Gulen Barry Syndrome Treatment and Care

उपचार आणि काळजी

उपचारामध्ये इंट्राव्हेन्स इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) किंवा प्लाझ्मा एक्स्चेंज यांसारख्या इम्युनोथेरपीचा समावेश असून मज्जातंतूंचे नुकसान कमी करण्यासाठी या उपचारपद्धतीचा आधार घेण्यात येतो. या आजाराच्या बचावासाठी नियमितपणे संतुलित आहार घेणे, वर्कआउट सोबतच योगा आणि मेडिटेशन करा. कोणतीही लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या

महत्त्वाच्या बातम्या : 

Gulen Barry Syndrome | गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजाराने राज्यात थैमान घालायला सुरुवात केली आहे. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीला …

पुढे वाचा

Health Maharashtra Marathi News Pune

Join WhatsApp

Join Now