Namdev Shastri । मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनाम्याच्या मागणीवरून प्रखर विरोध होत आहे. तर दुसरीकडे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या या कृतीचे आश्चर्य व्यक्त केले जात असून त्यांनाही सर्व स्तरातून विरोधाचा सामना करावा लागत आहे.
एका मुलाखतीदरम्यान शास्त्री यांना न्यायाने वाल्मिक कराड (Walmik Karad) तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल का? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर “त्यांनी तो नेता नाही. आपण नेत्यांविषयी बोलत आहे” अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी दिली आहे.
दरम्यान, काल नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा देत आरोपींविषयीही मोठे वक्तव्य केले होते. “ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली? याचा विचार केला पाहिजे. हत्या करणाऱ्यांना अगोदर मारहाण झाली होती. त्याचीही दखल घेण्याजोगी आहे. हे मीडियाने का दाखवलं नाही? हा विषय त्यांच्या मस्साजोग या गावातल्या बैठकीतला होता,” असे खळबळजनक वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केले आहे.
Namdev Shastri on Walmik Karad
जर भगवानगडावरचे महंतच आरोपींबाबत अशाप्रकारची वक्तव्य करत असतील तर सर्वसामान्यांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा? असा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात पडला आहे. दरम्यान, या वक्तव्यावरून शास्त्रींना अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :