🕒 1 min read
Punjab Kings । दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रिकेट चाहत्यांना IPL चे वेध लागले आहेत. यंदा सुरु होणाऱ्या IPL च्या (IPL 2025) सामन्यांमध्ये अनेक नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या कामगिरकीडे विशेष लक्ष असणार आहे. कोणता संघ ट्रॉफी जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल.
यंदा पंजाब किंग्जने असे काही निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे संघ ट्रॉफी जिंकू शकतो. दरम्यान, पंजाब किंग्जकडून आयपीएल 2025 मेगा लिलाव होण्यापूर्वी रिकी पॉन्टिंगला (Ricky Ponting) त्यांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जेव्हा या संघाचा रिकी पॉन्टिंगसारखा प्रशिक्षक असेल तेव्हा त्या संघाचे भाग्य बदलणे निश्चित आहे.
पंजाब किंग्जने आयपीएल 2025 मेगा लिलावातून श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) विकत घेतले आणि अलीकडेच त्यांना त्यांचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. दरम्यान, जेव्हा अय्यर या संघात आला, तेव्हा तो संघाची कमांड घेईल हे स्पष्ट झाले होते. परंतु आता संघाने अधिकृतपणे याची पुष्टी केली आहे. अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगची जोडी आयपीएल 2025 मध्ये विशेष कामगिरी करू शकतील.
या जोडीने एकत्रितपणे दिल्ली कॅपिटल्स स्थिती सुधारली होती. दिल्लीने 2019 मध्ये 7 वर्षानंतर प्रथमच प्लेऑफसाठी पात्रता मिळविली, जेव्हा ही जोडी कार्यरत होती. आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र आली आहे. याचा संघाला फायदा होऊ शकतो.
Punjab Kings IPL 2025
या संघाने मार्को येन्सेन (Marco yensen), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), मार्कस स्टोनिस (Marcus Stoinis) या खेळाडूंना खरेदी करून संघात सामील करून घेतले आहे. हे अष्टपैलू खेळाडू आहेत. मागील हंगामात स्टोनिस लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला होता तर मार्को येन्सेनने अंतिम फेरीत सनरिसर्स हैदराबादच्या अग्रगण्य भूमिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या खेळाडूंचाही संघाला विशेष फायदा होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
- “लेकरे पोरकी झाली, आमची मानसिकता काय… ?” Namdev Shastri वर धनंजय देशमुख यांचा निशाणा
- Budget 2025 मुळे बळीराजाचे पालटणार नशीब? अर्थमंत्र्यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
- संतापजनक! Eknath Shinde यांच्या नेत्याच्या हत्येमागचं मोठं कारण आलं समोर, जाणून तुम्हालाही बसेल धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












