Share

“लेकरे पोरकी झाली, आमची मानसिकता काय… ?” Namdev Shastri वर धनंजय देशमुख यांचा निशाणा

Santosh Deshmukh family has been hurt by Namdev Shastri decision. Now Dhananjay Deshmukh has made a big announcement about this.

by MHD

Published On: 

Dhananjay Deshmukh targets Namdev Shastri on Santosh Deshmukh murder case

🕒 1 min read

Namdev Shastri । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील 8 आरोपींना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. परंतु, यातील कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा आरोपी अजूनही पोलिसांना गुंगारा देण्यास यशस्वी ठरत आहे. दरम्यान, सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

अशातच काल भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, नामदेव शास्त्रींच्या निर्णयामुळे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय दुखावले आहे. याबाबत आता धनंजय देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे.

“नामदेव शास्त्री म्हणाले की या हत्येतील आरोपींची मानसिकता खराब झाली. पण त्यांच्याकडे सगळी माहिती नसल्यामुळे ते असे म्हणाले. आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल? आमची लेकरे पोरकी झाली आहेत. माझा भाऊ गेला आहे. आई-वडील म्हातारे झाले आहेत. आता आम्ही काय करायचे? आमचा भाऊ परत कुठून आणायचा? असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

Dhananjay Deshmukh on Namdev Shastri Maharaj

पुढे ते म्हणाले की, “नामदेव शास्त्री यांना याप्रकरणातील खरी माहिती अशी आहे की, मस्साजोग येथील अवादाच्या प्लांटवर खंडणीसाठी ते सगळे आरोपी आले होते. त्यांनी आमच्या गावातील दलित बांधवाला मारहाण केली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे. हत्या केलेल्या आरोपींवर किती गुन्हे आहेत? याची कोणाला माहिती नाही. हे सगळे पुरावे घेऊन आम्ही भगवानगडावर जाणार आहे, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)