Share

चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई होणार? Aditi Tatkare यांचं मोठं विधान, म्हणाल्या…

by MHD
Aditi Tatkare on Mukhyamantri Ladki Bahin Yojana

Aditi Tatkare । राज्यातल्या महायुती सरकारला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा झाला. या योजनेच्या 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. परंतु, आता या योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे.

ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यातील अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे प्रशासनाला चांगलीच जाग आली आहे.

यावर चुकीची माहिती देवून लाभ घेणाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्र नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना मोठा धक्का बसला आहे. बनावट अर्जदारांना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून त्यांची आता सखोल चौकशी केली जाणार आहे.

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana

तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान राज्यात पुन्हा महायुती सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दर महिन्याला 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या काही नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता या योजनेच्या महिलांना 2100 रुपये कोणत्या महिन्यापासून दिले जाणार? याकडे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Aditi Tatkare has made a big statement on the information that many women in the state have taken benefits by giving wrong information.

Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now