Gas cylinder । दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG gas cylinder) किमतीत बदल होत असतात. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळालाय. अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही तास गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. (LPG gas cylinder rate)
इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर, तेल विपणन कंपनी (Oil Marketing Company) कडून 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीनतम किंमती (Commercial Gas Cylinder Rate) जाहीर करण्यात आल्या आहेत. हे नवीन दर 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू झाले आहेत. देशातील चार मेट्रोविषयी बोलताना, दिल्लीत हे दर 1797 रुपये खाली आले आहे. तर कोलकातामध्ये त्याची किंमत 1911 रुपयांपासून ते 1907 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मुंबईत हे दर 1749.50 रुपये आहेत आणि चेन्नईमध्ये ही किंमत 1966 रुपयांवरून 1959.50 रुपयांवर आली आहे. (LPG gas cylinder price)
सन 2025 च्या सुरूवातीस म्हणजेच 1 जानेवारी दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या होता. नवीन वर्षाच्या निमित्ताने तेल आणि गॅस विपणन कंपन्यांनी दिल्ली ते मुंबईला एलपीजी सिलिंडरची किंमत 14-16 रुपये कमी केली. मागील वर्षीच्या शेवटच्या महिन्यात, 19 किलो गॅस सिलिंडर्सच्या किंमती वाढवल्या होत्या.
Domestic LPG Gas Cylinder Prices
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती
अनेक दिवसांपासून 1 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल पाहायला मिळत आहे. परंतु 1 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. त्याचे दर 1 फेब्रुवारी रोजी स्थिर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- १० वी, १२ वी च्या कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज, कडक अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
- “संतोष देशमुख हत्याप्रकरणी विनाकारण मराठा-ओबीसी जातिवाद आणला जातोय” Chhagan Bhujbal यांनी टोचले धनंजय मुंडेंचे कान
- “..तर मातोश्री फोडून टाकू”; नामदेव शास्त्रींच्या समर्थकाने Uddhav Thackeray यांना शिवीगाळ करत दिली धमकी