Chhagan Bhujbal । मागील काही दिवसांपासून राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्याप्रकरण चांगलेच गाजत असून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. यावरून आता आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“देशमुखांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली आहे. राक्षसही अशी कृती करणार नाही. या प्रकरणातील आरोपींना फाशी नाही तर हाल-हाल करुन मारलं पाहिजे. यामध्ये समाजाचा दोष नाही. हा सर्व समाजाचा प्रश्न असून कोणत्याही समाजच्या व्यक्तीवर असा हल्ला झाला तर त्याचा आपण निषेध केला पाहिजे,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, “संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी ही दोन्ही माणसे होती. ते मराठा आहे की दलित, यापेक्षा त्यांच्या हत्येचा निषेध करा. हा त्या समाजाचा आहे आणि तो त्या समाजाचा आहे? असा दुजाभाव नको. दुसऱ्या समाजावर हल्ला करणे हे बरोबर नाही. तुमच्या दुःखामध्ये मी सुद्धा सहभागी आहे. पण याप्रकरणी विनाकारण मराठा-ओबीसी (Maratha-OBC) जातिवाद आणला जातोय”, असे म्हणत भुजबळ यांनी एकप्रकारे मंत्री धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) कान टोचले आहेत. (Maratha vs OBC)
Chhagan Bhujbal on Dhananjay Munde
दरम्यान, बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) याचा हात असून सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी खासदार बजरंग सोनावणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :