Eknath Shinde । संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh murder case) अगोदरच राज्याचे वातावरण बदलले आहे. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करत राज्याच्या विविध भागातून मोर्चे काढले जात आहेत. अशातच आता आणखी एका हत्याप्रकरणाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पालघर जिल्ह्याच्या डहाणू विधानसभा मतदारसंघाचे संघटक अशोक धोडी (Ashok Dhodi) हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. धोडी यांचं अपहरण झाल्याची माहिती समोर येताच पालघर पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध सुरु केला होता.आज पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला आहे. (Ashok Dhodi Murder Case)
माहितीनुसार, अशोक धोडी यांचं 20 जानेवारी 2025 ला अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी घोलवड पोलीस ठाण्यात केली होती. धक्कादायक बाब म्हणजे अशोक धोडी यांचा धाकटा भाऊ हा फरार झाला होता. अशोक धोडी दारु तस्करीला अडचण ठरत होते त्यामुळे अविनाशने आपल्या भावाचं अपहरण केले असा संशय कुटुंबियांना संशय होता.
Eknath Shinde leader Ashok Dhodi murder In Gujrat Bhilad Stone Mine
अशोक धोडी यांचा तपास घेत पोलिसांचं एक पथक गुजरातच्या भिलाड येथे एका बंद दगडाच्या खाणीकडे (Gujrat Bhilad Stone Mine) गेले. याच खाणीच्या पाण्यामध्ये पोलिसांना अशोक धोडी यांची कार दिसली. कार काढण्यासाठी एक टीम पाण्यात उतरली. यावेळी पोलिसांना धोडी यांच्या काही वस्तू सापडल्या. कार पाण्यातून बाहेर काढली असता पोलिसांना डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह आढळला. दृश्यम सिनेमासारखा सापळा रचत हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धोडी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- “कराडला वाचवत असल्याने Dhananjay Munde यांनी राजीनामा द्यावा”, सुरेश धसांनंतर भाजपच्या बड्या नेत्याने केली मोठी मागणी
- Iswarya Ramanathan । शेतकऱ्याच्या लेकीची कमालच न्यारी! वयाच्या २४ व्या वर्षी झाली IAS अधिकारी
- “भ्रष्ट राजकारण्यांच्या मदतीला धर्मसत्ता धावते तेव्हा खंडणीतला वाटा त्यांनाही मिळालेला असतो” – Nikhil Wagle