Share

“भ्रष्ट राजकारण्यांच्या मदतीला धर्मसत्ता धावते तेव्हा खंडणीतला वाटा त्यांनाही मिळालेला असतो” – Nikhil Wagle

by MHD
Nikhil Wagle criticism of Namdev Shastri Maharaj and Dhananjay Munde

Nikhil Wagle । एकीकडे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यावरून राज्याचे राजकीय वातावरण पेटले असताना आता यात भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी मुंडेंना दिलेल्या पाठिंब्याची भर पडली आहे. नामदेव शास्त्री यांच्या निर्णयावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनीही आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत नाव न घेता धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यावर टीका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटले आहे.

Nikhil Wagle React On Namdev Shastri support Dhananjay Munde

“भ्रष्ट राजकारण्यांच्या मदतीला धर्मसत्ता धावते तेव्हा खंडणीतला वाटा त्यांनाही मिळालेला असतो”, असा गंभीर आरोप निखिल वागळे यांनी केला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनीदेखील नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडेंवर (Pankaja Munde) एक्स अकाउंटवरून निशाणा साधला आहे.

Bhaiya Patil React On Namdev Shastri support Dhananjay Munde

“आता काही वेळापूर्वीच न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांची प्रेस पाहून धक्का बसला. स्वतःच्या नावापुढे न्यायाचार्य लावणाऱ्या या महाराजाने हाल हाल करून ठार मारणाऱ्या गुन्हेगारांचे समर्थन कसे काय केले. संत ज्ञानेश्वराचं नाव नेहमी घेतात. संत ज्ञानेश्वर यांच्याकडून थोडीही करुणा घेता आली नाही की वाल्या आणि खुनी गँगचे उघड उघड समर्थन करत आहेत. त्यांची मानसिकता बिघडली म्हणून त्यांनी खून केला त्यांच्या मानसिकतेकडे पहा म्हणतोय.

अहो उद्या याचं न्यायाने दहशतवादी आणि आतंकवादी कृत्याचा सुद्धा हे समर्थन करतील. मला वाटायचे हा माणूस भगवानबाबा सारखा असावा पण हा मोठा जातीयवादी निघाला. गडावरून पंकजा मुंडे यांना काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनी केलेली मदत. त्या मदतीची परतफेड करण्यासाठी महाराज खून्याच्या समर्थनात आलेत. या अगोदर पंकजा मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याच्या समर्थनात यांनी प्रेस घेतलेली का?? त्या संतोष देशमुख यांच्या खुनाला हे शुल्लक व किरकोळ समजत आहेत काय म्हणावे? यांच्याकडे काही संवेदना आहे की नाही?,” असा सवाल भैया पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Prashant Kadam React On Namdev Shastri support Dhananjay Munde

पत्रकार प्रशांत कदम यांनीही नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्यावर एक्स अकाउंटवरून निशाणा साधला आहे. “नामदेव शास्त्री यांच्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाबद्दल आदर आहे. भगवान गडाचा राजकीय वापर होऊ नये ही काही वर्षांपूर्वी त्यांची भूमिका होती. आज याच भगवानगडावरून त्यांनी राजकीय भूमिका घेतलेली आहे. बरं नुसतं काठावरचे बोलले नाहीयत..

तर अगदी आरोपींच्या मानसिकतेचा विचार करा, त्यांनाही मारहाण झाली होती असं म्हणत एक प्रकारे हत्येच्या समर्थनाची भाषा जी महंत लोकांच्या तोंडी अजिबात शोभून दिसत नाही. आमच्या क्षेत्रात कोणाला इतका त्रास झाला असता तर तो संत झाला असता इतका त्रास धनंजयला झाला आहे. त्याच्या हाताला सलाईन लावली आहे.इतके कनवाळू उद्गार काढले आहेत त्यांनी. समाजावर प्रभाव ठेवण्यासाठी त्यांची विद्वत्ता, ज्ञान पुरेसं आहे. त्यासाठी धनंजय मुंडेंची काय गरज लागत असावी त्यांना?,” असा सवाल प्रशांत कदम यांनी उपस्थित केला आहे.

इतकेच नाही तर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर सडकून टीका केली आहे. एकंदरीतच आज पुन्हा एकदा नामदेव शास्त्री यांच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. प्रखर टीकेनंतर नामदेव शास्त्री आपला निर्णय बदलतील का? असा सवालदेखील उपस्थित होऊ लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Senior journalist Nikhil Wagle also shared a post on his official X account and criticized Dhananjay Munde and Namdev Shastri without naming them.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now