Santosh Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरण (Santosh Deshmukh murder case) राज्यभर चांगलेच गाजले आहे. याप्रकरणी दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांना याप्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली असून आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. काही दिवसांपूर्वी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याची अफवा समोर आली होती तर तो कधी प्रयागराज आणि मध्यप्रदेशामध्ये असल्याची चर्चा झाली. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथकं संपूर्ण राज्यात मागावर आहेत.
अशातच आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला (Sudarshan Ghule) मकोका कोर्टाने (Macoca Court) मोठा दणका दिला आहे. सुदर्शन घुलेची आज एसआयटी कोठडी संपली असल्याने त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीड येथील मकोका कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुदर्शन घुलेच्या एका मोबाईलमधील डाटा हा फॉरेन्सीक विभागाने रिकव्हर केला होता. त्याच्यावर एकुण 9 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील आरोपींनी एकत्रितरित्या बरेच गुन्हे केलेले असून दाखल गुन्हा व संबंधीत गुन्हे याबाबत तपास पोलीस करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Dhananjay Munde आणि Walmik Karad अशा गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन नामदेव शास्त्रींनी करणे अत्यंत दुर्दैवी : जितेंद्र आव्हाड
- सततच्या राजीनाम्याच्या मागणीवरून Dhananjay Munde यांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले; “संतोष देशमुखांना न्याय देणं महत्वाचं का…”
- “गुंड थोडेच संप्रदाय चालवतात”, Manoj Jarange यांचे खळबळजनक विधान