Manoj Jarange । आज भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी मंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) माध्यमांशी संवाद साधताना पाठिंबा दिला आहे. यावरून पुन्हा एकदा राज्याचे राजकीय वातावरण पेटले आहे. यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी वक्तव्य केले आहे.
“गुंड थोडेच संप्रदाय चालवतात ? गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय चालवतील असं वाटत नाही. हे शिकवले आहे, असा मनात संशय येतो. नामदेव शास्त्री महाराज वेगळे आहेत. बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले असतील तर दुरुस्त करतील. एक बाजू सांगितली तर पटत असते. फास लागायला लागला तर असे होऊ शकते, विकृत पणाने केलेल्या कार्याला समाज पाठीशी घालत नाही,” असा टोला जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की, ” मुंडे कोणता सलोखा ठेवत आहेत ? यात नामदेव शास्त्री यांचा दोष नाही. न्यायची अपेक्षा न करणे फक्त गुंड सांभाळणे. त्यांची सर या गुंडाला नाही येणार? बलात्कार, खून असे करून स्वत:च्या जातीचे लोकांचे खून केले. पाप यांनी केलं पण नामदेव शास्त्री यांना पांघरून टाकायला लावलं का?”, असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
जरांगे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. यावर मुंडे काय प्रत्युत्तर देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) या लवकरच भगवानगडावर नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन मुंडेंविरोधात पुरावे देणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Santosh Deshmukh यांच्या प्रकरणातील आरोपींना आधी मारहाण झाली, म्हणून त्यांची मानसिकता बिघडली : महंत नामदेव शास्त्री
- संतापजनक! OSD ला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश Ambadas Danve यांनी अधिकाऱ्यांना केली शिवीगाळ
- नामदेव शास्त्रींनी मुंडेंना पाठिंबा देताच Anjali Damania आक्रमक, ‘ते’ पुरावे घेऊन जाणार भगवानगडावर