Ambadas Danve । नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे डीपीडीसी बैठक (DPDC meeting in Chhatrapati Sambhajinagar) पार पडली. या बैठकीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते. परंतु, बैठक सुरु होण्यापूर्वी त्यांचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले.
यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर शरद पवार गटाचे सोशल मीडिया फ्रंट प्रदेश संघटक संदीप उदमले (Sandeep Udmale) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अंबादास दानवे हे अधिकाऱ्यांना शिवीगाळ करताना दिसत आहेत.
दरम्यान, जिल्हा नियोजन बैठक सुरू होण्यापूर्वी अंबादास दानवे यांच्या OSD ला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश दिला नाही. त्यामुळे अंबादास दानवे चांगलेच संतापले होते. दानवे यांनी प्रवेश नाकारणाऱ्यांना तिथल्या तिथेच सुनावलं आहे.
त्यांच्या या कृतीवरून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दानवे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत. जर ते किरकोळ कारणावरून अशीच शिवीगाळ करत राहिले तर येणाऱ्या पिढीने त्यातून काय संदेश घ्यावा? विधान परिषदेतदेखील दानवे जनतेचे प्रश्न अशीच शिवीगाळ करून मांडणार का? शुल्लक कारणावरून जर दानवे शिव्या देत असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या? असा सवाल उपस्थित होत आहे.
एखाद्या लोकप्रतिनिधीकडून जर अशाप्रकारे अधिकाऱ्यांना शिवीगाळ होणे ही खूप लाजिरवाणी बाब आहे. याप्रकरणी दानवे संबंधित अधिकाऱ्यांची माफी मागून पुढे असे प्रकार न होण्याची जबाबदारी घेणार का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य करत आहे.
Ambadas Danve abused the officers
सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडून अब्दुल सत्तार, सुरेश धस, संजय बांगर, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, गुलाबराव पाटील, संजय राऊत, अंबादास दानवे यांच्यासारखे नेते खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करताना किंवा वादग्रस्त वक्तव्य करताना आपण अनेकदा पाहिले आहेत. हे जर असेच प्रकार सुरु राहिले तर सर्वसामान्यांनी कुणाकडून अपेक्षा ठेवायची असाही मुद्दा उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- नामदेव शास्त्रींनी मुंडेंना पाठिंबा देताच Anjali Damania आक्रमक, ‘ते’ पुरावे घेऊन जाणार भगवानगडावर
- “एवढं होऊनही अजित पवारांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित…”; Jitendra Awhad यांचा घणाघात
- Santosh Deshmukh हत्येप्रकरणात भगवानगड भक्कमपणे मुंडेंच्या पाठिशी, महंत नामदेव शास्त्री स्पष्टच म्हणाले…