Santosh Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांनी गुरुवारी रात्री उशिरा भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांची भेट घेतली होती. (Santosh Deshmukh murder case)
दरम्यान, आता या प्रकरणी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी वक्तव्य केले आहे.”आमच्यात राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक विषयांवर दोन अडीच तास चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की तो मुलगा राजकीय घराण्यात जन्माला आला आणि सर्व पक्षात त्याचे मित्र आहेत. परंतु, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे,” असा आरोप नामदेव शास्त्री यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “याप्रकरणी भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. जे गुन्हेगार असतील त्यांचा शोध सुरु आहे. ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली? हे मीडियाने दाखवायला हवं होते. धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा माणूस नाही. त्यांची पार्श्वभूमी ती नाही”, असे नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केले.
Dhananjay Munde Meet Namdev Shastri Maharaj
दरम्यान, धनंजय मुंडे यांना नामदेव शास्त्री यांनी भक्कमपणे पाठिंबा दिल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जी भूमिका आहे तीच भूमिका आमची असल्याचे स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या :