Share

Plane crash | लष्कराच्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमानाची धडक! अमेरिकेत भीषण अपघात

Washington DC Plane Crash american airlines collided with a military helicopter

Washington DC Plane Crash: अमेरिकेत एक लष्करी हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. वाशिग्टन डीसीमध्ये रीगन नॅशनल एअरपोर्टजवळ हा अपघात झाला आहे. अमेरिकन एअरलाईन्सनचे ईगल फ्लाईट 5342 हे विमान आकाशात असताना लष्करी विमानाला धडकले.

प्रवासी विमान विमानतळावर उतरणार होते. त्याचवेळी समोरून अमेरिकन लष्कराचे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आले. विमान आणि हेलिकॉप्टरची धडक आकाशात झाली. त्यानंतर हेलिकॉप्टर आणि विमान तुकडे तुकडे होऊन पोटोमॅक नदीत कोसळले.

विमानात ६० प्रवासी होते, हे विमान कन्सासवरून वॉशिंग्टनला येत होते. विमानतळावर उतरवण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.

Washington DC Plane Crash American Airlines

महत्वाच्या बातम्या

Washington DC Plane Crash american airlines collided with a military helicopter

India Marathi News Travel

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या