🕒 1 min read
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून नोंदवला जाईल, असं पहाटे कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बारामतीत जे घडलं, त्याने केवळ राजकीय वर्तुळच नाही, तर सिनेसृष्टीही (Film Industry) हादरून गेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ‘मॅन ऑफ ॲक्शन’ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेनंतर अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने अत्यंत भावुक होत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि अजितदादांचे जुने फोटो शेअर करत रितेशने वाहिलेली श्रद्धांजली (Tribute) वाचून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. रितेश आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “ही बातमी ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राने आज आपला सर्वात गतिमान (Dynamic) नेता गमावला. त्यांच्या कामात कधीच कुचराई नसायची. ते नेहमीच इतरांना उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रेरित करायचे.”
Riteish Deshmukh on Ajit Pawar Death
अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना रितेशने पुढे लिहिलंय, “त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी (Void) निर्माण झाली आहे, ती कधीही भरून न निघणारी आहे. पवार कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी देव शक्ती देवो.” रितेशची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही हळहळ व्यक्त करत आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना लँडिंगच्या वेळी हा भीषण अपघात झाला. यात अजितदादांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावरची मजबूत पकड ही अजितदादांची ओळख होती. सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पद भूषवणारा आणि पहाटेपासून कामाला जुंपणारा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हा अपघात की घातपात?; अजितदादा भाजप सोडण्याच्या तयारीत होते म्हणून…? अजितदादांच्या मृत्यूनंतर बॅनर्जींचा मोदी सरकारवर भीषण हल्लाबोल!
- “हा अपघात की…?” अजितदादांच्या निधनानंतर ममता बॅनर्जींची मोठी मागणी; म्हणाल्या, सखोल चौकशी करा!
- “मी पवार कुटुंबासोबत…” अजितदादांच्या निधनावर राहुल गांधींची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, हे अत्यंत दुःखदायक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











