Suresh Dhas । भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राजकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यानेच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
अशातच आज सुरेश धस यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत त्यांना पेन ड्राईव्ह द्वारे पुरावे देणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
“उपमुख्यमंत्री माननीय @AjitPawarSpeaks दादा यांच्या माध्यमातून अतिशय चांगले काम जिल्ह्यात होत आहेत. अजित दादांचा कामांचा उरक चांगला आहे. तसेच, दादांची निर्णयक्षमता देखील फास्ट आहे. दादा पालकमंत्री झाल्यावर बीडमध्ये फरक दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दादांनी वारंवार जिल्ह्यात यावं ही आमची अपेक्षा आहे. भ्रष्टाचाराच्या विषयात तथ्य असतील तर कारवाई करावी अशी मागणी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे. मी बिगर तथ्याच बोलत नाही.आज मी त्यासंदर्भातील पुरावे पेन ड्राईव्ह द्वारे देणार आहे,” असे धस यांनी स्पष्ट केले होते.
Suresh Dhas meet Ajit Pawar
सूत्रांच्या माहितीनुसार धस यांनी अजित पवारांना तो पेन ड्राईव्ह दिला आहे. यावरून आता धस कोणते पुरावे दिले? असा सवाल उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे सत्तेत सहभागी असूनही सुरेश धस हे सतत धनंजय मुंडेंवर का निशाणा साधत असतात? असा देखील सवाल अनेकांच्या मनात पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? Devendra Fadnavis यांनी अखेर स्पष्टच सांगितलं, म्हणाले….
- “4-5 जागांवरून अजित पवारांना कशा मिळाल्या 42 जागा?” विधानसभेच्या निकालावर Raj Thackeray पहिल्यांदाच बोलले
- “धनंजय मुंडेंवर मकोका लावणार का? त्यांचा राजीनामा घेऊन…” अंजली दमानियांनी दिले Ajit Pawar यांना मोठे आव्हान
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले