Raj Thackeray । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यादरम्यान, त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर तब्बल दोन महिन्यांनी भाष्य करत निवडणूक निकालावर संशय व्यक्त केला आहे.
“पक्ष फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांचे चार ते पाच आमदार तरी येतील का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण त्यांच्या निवडणुकीत एकूण 42 जागा निवडून आल्या. यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? शरद पवार (Sharad Pawar) इतके दिवस राजकारणात आहेत. त्यांच्या जिवावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अजित पवार मोठे झाले आहेत, त्यांना इतक्या कमी जागा कशा मिळाल्या? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “आमच्या राजू पाटील (Raju Patil) यांना त्यांच्याच गावात एकही मत मिळाले नाही. पण एकेकाळी त्यांच्या गावात त्यांना 1400 मते मिळायची. विधानसभेच्या या निकालावर निवडून आलेल्या लोकांचा देखील विश्वास बसत नाही. तब्बल सात वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरातांचा या निवडणुकीत पराभव झाला. सगळ्या राज्याला या निकालावर शॉक बसला आहे,” असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Raj Thackeray on Maharashtra Vidhansabha Election Result
दरम्यान, आतापर्यंत केवळ विधानसभेच्या निकालावर महाविकास आघाडी संशय घेत होती. परंतु आता यात राज ठाकरेंचाही समावेश झाला आहे. मनसेच्या मेळाव्यात बोलताना केलेल्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महायुती काय उत्तर देते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :