Poonam Pandey । बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असते. ती सोशल मीडिया (Social media) वर देखील खूप सक्रिय असते. चाहत्यांना घायाळ करणारा लूक (Poonam Pandey Look) आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते.
काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पसरवली होती. ज्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. याप्रकरणी तिने माफीदेखील मागितली होती. नुकतीच ती तिच्या टीमसह प्रयागराज (Poonam Pandey in Prayagraj) येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाली होती.
पूनमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ आणि फोटो (Poonam Pandey Mahakumbh Mela Photos) शेअर केले आहेत. तिथल्या गर्दीतही ती अडकली होती. ‘शक्ती कमी झाली तरी श्रद्धा कमी होता कामा नये. ओम नमः शिवाय, असे म्हणत पूनमने महाकुंभ मेळ्यातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
त्यानंतर पूनमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मौनी अमावस्येला गंगेत अमृत स्नान करतानाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यावर तिने ‘तिची सगळी पाप धुतली गेली’, असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनवरून पुन्हा एकदा ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
अनेकांनी तिच्या या कॅप्शनवर आश्चर्य व्यक्त केले आहे. गंगेत अमृत स्नान करून खरोखरच तिची पापे धुतली का? असा सवाल नेटकरी तिला विचारू लागले आहेत. तसेच तिने महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर वक्तव्य केले आहे. “हे खूप दुर्दैवी आहे. मोठ्या संख्येने लोक महाकुंभात येत आहेत,” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
दरम्यान, प्रयागराज येथे महाकुंभ मेळा 13 जानेवारीपासून सुरू झाला आहे आणि तो येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. आतापर्यंत या मेळ्यादरम्यान अनुपम खेर, रेमो डिसूजा, गुरु रंधावा, शंकर महादेवा, ममता कुलकर्णी, कैलाश खेर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी पवित्र स्नान केले आहे.
Poonam Pandey in Mahakumbh Mela
पूनम पांडेबद्दल सांगायचे झाले तर 2011 मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डकप फायनलच्या वेळी जर भारत वर्ल्ड कप जिंकला तर सर्वांसमोर कपडे काढेन, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर तिने 2013 मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्याशिवाय तिने अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ या रिअॅलिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
- Walmik Karad च्या वाइन शॉपसाठी नियम डावलून अवघ्या चारच दिवसांत दिले ना हरकत प्रमाणपत्र; धक्कादायक माहिती समोर
- संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवं वळण? अमित शाहांची भेट घेत Supriya Sule करणार मोठी मागणी
- मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या Suresh Dhas आणि प्रकाश सोळंकेंना Ajit Pawar यांचा पहिला धक्का! जिल्हा नियोजन समितीमधून काढलं