Ajit Pawar । भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत. बीड दौऱ्यावर असताना त्यांनी सुरेश धस यांच्याबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून सुरेश धस यांना काढले आहे. तसेच आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांना देखील काढण्यात आले आहे. त्यांच्याजागी बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित (Vijay Singh Pandit) आणि भाजप (BJP) कोट्यातून आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके हे दोन्ही नेते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होते. यामुळे राजकीय वातावरण तापले होते. अशातच या दोन्ही नेत्यांना जिल्हा नियोजन समितीमधून काढून टाकण्यात आले आहे.
Beed District Planning Committee
“आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीने सांगणार आहे. कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील, विकासाची कामं करताना कुणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. मी टोकाची भूमिका घेईन, असा इशारा देखील अजित पवार यांनी बीड दौऱ्यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :