Manoj Jarange । मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे म्हणून सातव्यांदा उपोषणासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.
शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ करून मनुष्यबळ वाढवा, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी तातडीने करा, कक्ष सुरू करा, वंशावळ समिती गठीत करा, संख्याबळ द्या,नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या मराठा समाजाने राज्य सरकारसमोर ठेवल्या आहेत.
आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिला आहे. “मी आता उपोषण करणार नाही. मागील पावणे दोन वर्षे आंदोलन केली. मी आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता उपोषण सोडण्याबाबत मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
Manoj Jarange Patil protest for Maratha Reservation
पुढे ते म्हणाले की, “आता आमचे डोळे उघडले आहेत. खऱ्या आरक्षणाचा मारेकरी कोण हे सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जाणून बुजून काम करत नाही, हे मराठा समाजाला समजलं आहे,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :