Bageshwar Baba । अनेक ठिकाणी भव्य दरबार भरवून लोकांच्या मनातले सांगणारे बागेश्वर बाबा अल्पावधीत खूप लोकप्रिय झाले आहेत. परंतु, हेच बागेश्वर बाबा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतात.
सध्याही त्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. नुकतेच ते प्रयागराज (Prayagraj) येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी जे लोक या महाकुंभ मेळ्यात (Mahakumbh Mela) सहभागी होत नाही ते देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. (Mahakumbh Mela in Prayagraj)
“सर्वांनी महाकुंभ मेळ्यात आले पाहिजे. जे या मेळ्यात सहभागी होत नाहीत, ते देशद्रोही आहेत. त्यांना पश्चाताप होईल. या मेळ्यात माझ्यासाठी चांगली व्यवस्था केली आहे. ज्यांच्यामध्ये विरोधाचा किडा नाही त्यांना येथे चांगली व्यवस्था दिसत आहे. पण जे विरोध करतात, त्यांच्या मनात आस्था नाही त्यांना येथे चांगली व्यवस्था दिसत नाही,” असा आरोप बागेश्वर बाबा यांनी केला आहे.
बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून नेटकरी चिडले आहेत. “माझा भाऊ सैन्यात असून तो सीमेवर कर्तव्य बजावत आहे, तो महाकुंभात आंघोळ करायला येऊ शकत नाही, तर तो देशद्रोही आहे का? देशाची मोठी लोकसंख्या महाकुंभाला येऊ शकणार नाही. ही संपूर्ण जनता देशद्रोही आहे का? हा बाबा कोणत्या आधारावर देशातील करोडो जनतेला देशद्रोही म्हणत आहे?, अशी संतप्त प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
Bageshwar Baba on Mahakumbh Mela
दरम्यान, यावरून अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. यावरून देशासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करणारे जवान देखील महाकुंभ मेळ्यात न झाल्याने ते देशद्रोही आहेत का? पुरेसे भांडवल उपलब्ध होऊ न शकल्याने अनेकांना या मेळ्यात सहभागी होता येत नाही, ते देखील देशद्रोही आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्यावरून बागेश्वर बाबा माफी मागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :