Mahakumbh Mela । प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी शाही स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. या दरम्यान, चेंगराचेंगरी होऊन 17 भाविकांना आपले प्राण गमवावे लागले तर शेकडो जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Prayagraj Mahakumbh Mela)
यावरून आता प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यातील भाविकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर निशाणा साधला आहे. समाजवादी पार्टीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “या घटनेत आम्ही मरता मरता वाचलो. योगी यांना आम्ही खूप मानायचो. साधू असूनही त्यांच्याकडे साधुंसारखे गुण नाहीत. त्यांनी आम्हाला येथे मारण्यासाठी बोलावले आहे का? या घटनेनंतर पोलीस देखील उशिरा दाखल झाली. महिला नग्न झाल्या. यावर नग्न होऊन महिला अंघोळ करत नाही का?,” असा लाजिरवाणा सल्ला पोलिसांनी दिल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.
विशेष म्हणजे याच ठिकाणी एकूण 30 पूल बांधले गेले आहेत. परंतु हे पूल भाविकांसाठी बंद केले होते. भाविकांना तासंतास वाट पाहावी लागली. प्रशासनाच्या VVIP कल्चर मुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. VVIP लोकांना विशेष सोयी परंतु सर्वसामान्यांना योग्य ती वागणूक दिली जात नाही असा आरोप भाविक करत आहेत.
दरम्यान, प्रयागराज चेंगराचेंगरीप्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारवर भाविकांसह विरोधकांनी ताशेरे ओढले आहेत. “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा भाविकांच्या सुरक्षेवर लक्ष द्यायला हवे होते. कुंभमेळ्यासाठी 10 हजार कोटींपेक्षा जास्ट बजेट दिले. पण ते प्रत्यक्षात दिसत नाहीत. कुंभमेळ्यातील 10 हजार कोटी कुठे खर्च झाले?” असा सवाल खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे.
Prayagraj Mahakumbh Mela stampede
“भाविकांनी एकाच वेळी गर्दी केली असल्याने ही घटना घडली आहे. चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी असून यात प्रशासनाची कोणतीही चूक नाही,” अशी प्रतिक्रिया आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी (Ravindra Puri) यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :