Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh murder case), मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या कारनाम्यावरून राज्याचे राजकीय वातावरण चिघळले आहे.
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने सध्या मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, अजित पवार गटाचे काही नेते यांच्यासह विरोधक देखील त्यांचा राजीनामा मागत आहे.
याचप्रकारणी आता परळीकर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड च्या समर्थनासाठी एकवटले आहेत. धनंजय मुंडे यांच्या विरोधात गेले दोन महिने नकारात्मक बातम्या लावून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याच काम सुरू आहे. परंतु हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आम्ही खंबीर आहोत, अशी प्रतिक्रिया परळीकरांनी माध्यमांना दिली आहे.
“वाल्मिक कराड हे प्रत्येकाला मदत करतात. परंतु आता त्यांच्यावर खोट्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. सुरेश धस यांनी त्यांचे प्रस्थ वाढत असून खोटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तातडीने हे गुन्हे मागे घेण्यात यावेत,” अशी मोठी मागणी देखील परळीकरांनी केली आहे.
Parlikar On Dhananjay Munde
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या समर्थनासाठी परळीकर एकवटल्याने यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाल्मिक कराड विरोधात इतके पुरावे समोर येऊन देखील परळीची जनता कराडला कशी पाठीशी घालते? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरून राजकीय वातावरण देखील तापू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :