Walmik Karad । वाल्मिक कराडवर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या आणि दोन कोटी खंडणी घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्यावर सध्या मकोका अंतर्गत कारवाई सुरु आहे. याचदरम्यान वाल्मिक कराडची आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीची राज्याच्या विविध भागात करोडो रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.
साधा घरगडी असणाऱ्या वाल्मिक कराडने करोडो रुपयांची मोहमाया कशी जमवली? असा सवाल प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव (Jyoti Mangal Jadhav) च्या नावे साडे सतरा कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.
अशातच ज्योती मंगल जाधवच्या नावे लातूरमध्येदेखील आलिशान बंगला आणि करोडो रुपयांची संपत्ती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Walmik Karad Wife Property) परंतु, संतोष देशमुख हत्या आणि खंडणीप्रकरण समोर येताच वाल्मिक कराडने या बंगल्याचे काम तातडीने थांबवले आहे.
Walmik Karad Wife Property in Latur
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील न्यू सरस्वती कॉलनी भागात या बंगल्याचे काम सुरु होते. दरम्यान, वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असताना आणखी किती खुलासे समोर येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Dhananjay Munde यांनी तातडीने गाठली दिल्ली, राजीनाम्यासाठी वाढला दबाव; आज होणार महत्त्वाचा निर्णय?
- Local Body Elections । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या! कोर्टाकडून नवीन तारीख जाहीर
- “Santosh Deshmukh यांची लेकरं न्यायासाठी वणवण…” ‘बापाचं काळीज म्हणणाऱ्या’ Dhananjay Munde यांच्यावर टीका